वाशिम: शहरात अतिशय जुने असलेले ह्यटेम्पल गार्डनह्ण अतिशय दुर्लक्षित झाले होते. या गार्डनला संपूर्ण अतिक्रमणाने वेढले आहे. याबाबत लोकमतने पाठपुरावा केला होता. सदर जागेवर नाट्यगृहाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू झाली आहे.त्यादृष्टीने टेम्पलगार्डनच्या जागेवर साफसफाई करण्यात येत असून ट्रकमधून बांधकाम साहित्य येणे सुरू झाले आहे.या अद्यावत नाटयगृहाच्या बांधकाम प्रक्रीयेस प्रारंभ झाल्याने नाटयप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.अतिशय मोक्याच्या जागेवर व शहरापासून सर्वच दिशेने जवळ असलेल्या टेम्पल गार्डनच्या जागेवर नाटयगृह निर्माण करण्याचा प्रस्ताव वाशिम नगरपरिषदेने यापुर्वीच पारीत केला होता.त्यानंतर याबाबत नगरपरिषद प्रशासनाने २१ मे रोजी निवीदा मागविल्या होत्या.ती मंजूर झाल्यामुळे कंत्राटदाराने काम सुरू करण्याची तयारी केली ओहे.वाशिम शहरात ४ कोटी रूपयांचे होत असलेले हे नाटयगृह जिल्हयातील अद्यावत नाटयगृह ठरणार असल्याचे बोलल्या जात आहे.
अद्ययावत नाट्यगृहाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू
By admin | Published: June 14, 2014 8:43 PM