----------------
स्वच्छतेबाबत ग्रामस्थांत जनजागृती
वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे ग्रामपंचायतीकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, याअंतर्गत ग्रामपंचायतीच्यावतीने स्वच्छतेबाबत शुक्रवारी जनजागृती करण्यात आली.
---------------
कामरगाव येथील बाजार राहणार बंद
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर कामरगाव येथे भरणारा आठवडी बाजार या आठवड्यातही भरणार नाही. ९ जुलै रोजी ग्रामपंचायतीने त्याबाबत गावात माहितीही दिली असून, सूचनेचे पालन करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.
----------
कोरोनाबाबत जनजागृती
वाशिम : कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाकडून दक्षता घेतली जात आहे. याअंतर्गत ९ जुलै रोजी आसेगाव परिसरात जनजागृती करण्यात आली.
----------------
पोलिसांकडून वाहनांची तपासणी
वाशिम : जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. याअंतर्गत कारंजा - मानोरा मार्गावर २४ वाहनचालकांवर पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली. गेल्या चार दिवसांत अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
-----------