देहात्रे यांनी निवेदनात नमूद केले की, तीर्थक्षेत्र या लेखाशिर्षअंतर्गत केलेल्या कामाचे देयके देण्याची मागणी केली असून, संबंधित निवेदनाची दखल न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. प. पू. पितांबर महाराज संस्थान कोंडोली, ता. मानोरा येथे भक्तनिवासाचे बांधकाम पूर्ण केलेले असून, मात्र गत दोन वर्षांपासून या कामाचे सुद्धा देयक प्रलंबित आहे. सदर रक्कम व्याजासहित देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सोबतच भवानी माता संस्थान पारवा, ता. मंगरूळपीर येथे बांधलेल्या भक्तनिवासाच्या बांधकामाची रक्कम, भवानीमाता संस्थान पारवा येथील दुसरे देयक भक्तनिवास बांधकाम, संत गजानन महाराज संस्थान, बिटोडा भोयर येथील पहिल्या देयकाच्या भक्तनिवास बांधकामाची रक्कम तसेच दुसऱ्या देयकाची रक्कम असे एकूण दोन कोटी ४५ लाख ६४ हजार १७७ रुपयांचे देयके प्रलंबित आहेत. सदरची रक्कम १५ दिवसांत सर्व तिन्ही कामांचे देयके न मिळाल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसू, असा इशारा सुरेश देहात्रे यांनी दिला आहे.
कंत्राटदारांचे देयके थकित; उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 4:41 AM