भर जहागिर येथिल पाच अंगणवाड्यांमध्ये बालकांना पिण्याचे स्वच्छ पाणी अंगणवाडीमध्येच उपलब्ध व्हावे या उद्दात्त हेतुन स्थानिक ग्रामपंचायतने जवळपास दिड लाख रूपये किंमतीचे पाच 'वाॅटर फिल्टर' बसण्यासाठी कंत्राटदाराला काम दिले. यामध्ये वाॅटर फिल्टर,नळ फिटिंग,पाण्याची संचयासाठी छतावर पाचशे लिटर क्षमतेची टाकी ऐवढे साहित्य होते. सदर काम हे मागील एप्रिल महिण्यामध्ये पुर्ण होऊन कंत्राटदाराने देयके सुध्दा काढुन घेतली.
परंतु मागील पाच महिण्यापासुन या अंगणवाड्यातील 'वाॅटर फिल्टर'मधुन एकदाही पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध झालेले नाही. विशेष म्हणजे प्रभारी बालप्रकल्प अधिकारी विधाता कवटकर यांनी पाहणी करीत संबंधित वाॅटर फिल्टरचे काम पुर्ण करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या, तरी सुध्दा सदर कंत्राटदाराने या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचे बोलल्या जात आहे.
यासंदर्भात वाॅटर फिल्टर तात्काळ सुरु करावे अन्यथा आंदाेलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी सर्कल प्रमुख प्रकाश सभादिंडे यांनी दिला आहे.
भर जहागिर येथिल पाच अंगणवाड्यातील वाॅटर फिल्टरसंदर्भात ग्रामपंचायत सचिवांशी चर्चा करून पत्र देण्यात येईल.
विधाता कवटकर,
प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी पं.स.रिसोड