- धनंजय कपाले लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : हैद्राबाद येथे रोजमजुरीनिमित्त गेलेले ३५ मजुर राजस्थानमधील आपल्या गावी परत जाण्यासाठी कोणतेही वाहन न मिळाल्यामुळे ट्रकमधुन लपुन-छपुन प्रवास करीत होते. त्यांचा हा धक्कादायक प्रवास २८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता वाशिम येथे उघडकीस आला.लॉकडाऊनमुळे देशाच्या प्रत्येक राज्यात संचारबंदी लागु आहे. विविध राज्यामध्ये अनेक मजुर अडकुन पडले आहेत. अशा अडकुन पडलेल्या मजुरापैकी ३५ मजुर हे हैद्राबादहुन राजस्थानकडे जाण्यासाठी एका मालवाहु ट्रकमध्ये लपुन (आर.जे. ०७ जी.सी. १७०८) प्रवास करीत होते. हा प्रवास करताना या मजुरांनी प्रत्येक चेक पोस्ट ओलांडत असताना ट्रकमधुन उतरून काही अंतरापर्यंत पायदळ प्रवास करण्याची शक्कल लढविली. यामुळे चेक पोस्टवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना हा प्रकार निदर्शनास येत नसल्यामुळे चांगलीच पंचाईत होत असल्याचे रविवार २८ मार्च रोजी घडलेल्या या घटनेवरून अधोरेखीत होत आहे.
कनेरगाव नाक चेक पोस्टवर पोलखोलकनेरगाव नाका चेक पोस्टजवळ काही मजूर हे घोळक्याने पायदळ जात होते. त्यांना विचारणा केली असता, वाहन मिळत नसल्यामुळे राजस्थानकडे पायदळ जात आहोत. त्यानंतर काही वेळातच सदर मजूर हे एका मालवाहु (आर.जे. ०७ जी.सी. १७०८) ट्रकमधुन प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही बाब वाशिम शहर पोलीसांना कळविली. कालापाड नामक पोलीस शिपाई व एका होमगार्डच्या सहाय्याने हा ट्रक वाशिम शहरातील हिंगोली नाका परिसरात थांबविला. या सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांना पुढे मार्गस्थ करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.