शहरातील काही गृहिणींशी चर्चा केली असता त्यांच्या चर्चेतून कुटुंबात बनविण्यात येणाऱ्या फास्टफूडला नाकारून प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्याए पाेषक तत्त्व असणाऱ्या भाज्या, फळे, कडधान्यांचा वापर वाढलेला असल्याचे दिसून येत आहे. ताक, साबुत धान्य, फळे, पालेभाज्यांचे प्रमाण सद्यस्थितीत स्वयंपाकगृहात वाढलेले दिसून येत आहेत.
.............
प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी घरात आता कच्च्या भाज्या, कडधान्यांचा वापर वाढला
प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी घरातील किचनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले असून आता कच्च्या भाज्या, कडधान्ये, सॅलेडवर घराेघरी भर देण्यात येत आहे. तसेच फळेही मोठ्या प्रमाणात आणली जात आहेत.
जिरे, कोथिंबीर आणि हळद यासारख्या मसाल्यांचा जेवणात समावेश वाढला. वाळलेले आले आणि लसूण देखील अन्नामध्ये समाविष्ट करण्यात येत असून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवळा खाल्ला जाताेय.
चिकन आणि कोल्ड वॉटर फिश, हिरव्या भाज्या आणि छोले सारखे पदार्थ व्हिटॅमिनने समृध्द असल्याने त्यांचा वापर वाढला आहे.
.............
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोजच्या जेवणात हे हवेच
राेग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मुख्यत्वे नऊ पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. ती भरपूर फळे, सर्व भाज्या, ताक, मध, कडधान्ये, डाळींतून पूर्ण होऊ शकते. नऊ पाेषक तत्त्वांमध्ये प्राेटीन्स, कॅल्शियम, जीवनसत्व अ, फाॅलिक ॲसिड, जीवनसत्व ब, जीवनसत्व ई, लाेह व झिंकचा समावेश आहे. ही पाेषक तत्त्वे वरील पदार्थात असल्याचे आहारतज्ज्ञ डाॅ. मिनल औंधिया यांनी सांगितले.
...........
फास्ट फूडवर अघोषित बंदी
बहुतांश फास्ट फूडमध्ये चव वाढविण्याच्या उद्देशाने वापरण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये आरोग्याला घातक पदार्थ असतात. त्यामुळे आरोग्यावर संथपणे, परंतु विपरीत परिणाम होतो. यातून स्थूलपणा वाढण्याचे आणि अन्य आजारही वाढत असल्याने अनेकांनी फास्टफूड घरात आणणे बंद केले आहे.
..............
गृहिणी म्हणतात...
काेरानामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी च्यवनप्राश दिवसातून दोनदा रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत तसेच हळदीचे दूध पिणे यावर आमचे कुटुंब भर देत आहेत. तसेच भाज्यांच्या वापरामध्ये बदल झाला आहे.
- उज्वला खानझाेडे, वाशिम
काेराेनामुळे सर्व कुटुंब प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या पदार्थांवर भर देत आहे. विशेषत: पूर्वी आमच्या येथे फळांचा वापर कमी व्हायचा. परंतु आता यामध्ये वाढ झाली आहे. सकाळच्या आहारामध्ये कडधान्यांचा वापर करण्यात येत आहे.
- विजया सरप, वाशिम
काेराेनामुळे आमच्या स्वयंपाकगृहामध्ये पाेषक तत्त्व असलेले पदार्थ वाढविण्यात आले आहेत. यामध्ये कडधान्य, ताज्या पालेभाज्या, फळे, दूध, दही व ताक जेवणात घेतले जात आहे. यासंदर्भात आहारतज्ज्ञांचे मतसुद्धा घेतले आहे.
- अश्विनी गांजरे, वाशिम