राज्य शासनाने वाशिम जिल्ह्याकरिता २०२०- २१ या वर्षात ५४.६७ कोटी महसूल वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यात जमीन महसूल १७ कोटी १७ लाख, तर गौणखनिज वसुलीचे ३७ कोटी ५० लाख रुपयांच्या उद्दिष्टाचा समावेश होता. त्यात २०२०- २१ हे आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतरच जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागला. केंद्र शासनाने लॉकडाऊन जारी केला. त्यात मनोरंजनाच्या व्यवसायावर गदा आली, तर गत वर्षभरात वारंवार नैसर्गिक आपत्तींचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे महसूल वसुलीत खोडा निर्माण झाला. या विपरीत स्थितीतही महसूल विभागाने कसोशीने काम करीत ५३ कोटी १६ लाख १९ हजार रुपयांची वसुली करून उद्दिष्टाच्या ९७.२४ टक्के वसुली केली.
--------------
करमणूक करापोटी ३.०८ लाखांची वसुली
शासनाकडून करमणूक करापोटी निश्चित उद्दिष्ट ठरवून देण्यात आले नव्हते. त्यात कोरोना संसर्गामुळे सिनेमागृह आणि इतर मनोरंजनावर मर्यादा आल्याने या क्षेत्रातील वसुलीत खोडा निर्माण झाला. अशाही स्थितीत जिल्हा प्रशासनाने करमणूक करापोटी ३.०८ लाख रुपयांची वसुली करण्याची कामगिरी केली आहे.
-----------------
कोट :
राज्य शासनाने २०२०-२१ या आर्थिक वर्षात ५४.६७ कोटींच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट वाशिम जिल्ह्याकरिता निर्धारित केले होते. गतवर्षभरापासून कोरोना संसर्गाचा सामना प्रशासन आणि जनता करीत असताना महसूल वसुलीत अडचणी निर्माण झाल्या. तथापि, सर्वच तहसीलदारांनी कसोशीने प्रयत्न करून समाधानकारक वसुली केली.
-शैलेश हिंगे,
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम
----------------
...अशी आहे महसूल वसुली
एकूण उद्दिष्ट- ५४.६७ कोटी
जमीन महसूल उद्दिष्ट- १७.१७ कोटी
प्रत्यक्ष वसुली- १५.५१ कोटी
--------------------
गौणखनिज उद्दिष्ट- ३७.५० कोटी
प्रत्यक्ष वसुली- ३६.७१ कोटी
--------------------
करमणूक कर उद्दिष्ट- ००
प्रत्यक्ष वसुली- ३.०८ लाख
-------------
इतर वसुली ८९.७५ लाख