कारंजा तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासनाची झोप उडाली आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार धिरज मांजरे यांनी कठोर उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. ग्रामस्थांना नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन केले जात आहे. याच अनुषंगाने तहसीलदारांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाने गावागावांत फिरत्या व्हॅनद्वारे जनजागृती सुरू केली आहे. काजळेश्वर परिसरात सोमवारी ही व्हॅन फिरवून ग्रामस्थांना नाका-तोंडाला मास्क बांधा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आणि वारंवार हात धुवा या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच आरोग्यविषयक समस्या असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधा, असे आवाहनही केले आहे.
कोट: कारंजा शहरासह ग्रामीण भागातही कोरोना संसर्ग वाढत असल्याचे लक्षात येताच कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळावी व प्रशासनाचे निर्देश पाळावे.
- डॉ. किरण जाधव,
तालुका आरोग्य अधिकारी कारंजा
--
कोट: ग्रामस्थांची आरोग्य विभाग काळजी घेत आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या दृष्टीने प्रत्येकाने जबाबदारीने वागावे आणि कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य विभाग व प्रशासनाला सहकार्य करावे.
-डॉ. प्रशांत वाघमारे,
वैद्यकीय अधिकारी, काजळेश्वर