वाशिम : जिल्ह्यात मृत्यूसत्र कायम असून मंगळवार, २५ मे रोजी आणखी १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ३३५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३८८१७ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. मृत्यूसत्रही कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. आणखी १० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद मंगळवारी घेण्यात आली. दुसरीकडे नव्याने कोरोना रुग्ण आढळून येत असले तरी कोरोनावर मात करणाºयांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिसून येते. मंगळवारी नव्याने ३३५ रुग्ण आढळून आले तर ४८६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सर्वाधिक रुग्ण कारंजा तालुक्यात १०४ तर सर्वात कमी रुग्ण मालेगाव तालु्क्यात २३ आढळून आले आहेत. जिल्ह्याबाहेरील २२ बाधितांची नोंद झाली आहे. २८५४ सक्रिय रुग्णूमंगळवारच्या अहवालानुसार नव्याने ३३५ रुग्ण आढळून आले तर ४८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण २८५४ रुग्ण सक्रिय आहेत. तालुकानिहाय रुग्ण संख्यावाशिम- ५७मालेगाव- २३रिसोड- ५१मंगरूळपीर- ४६कारंजा- १०४मानोरा- ३२
Corona Cases in Washim : आणखी १० जणांचा मृत्यू; ३३५ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 5:55 PM