वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून गुरूवार, ८ जुलै रोजी १६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर ९ जणांनी कोरोनावर मात केली.एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१,५३१ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. गुरूवारी नव्याने १६ रुग्ण आढळून आले तर ९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रिसोड, मालेगाव व मानोरा शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत ४१५३१ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०७७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंंत ६२२ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्याबाहेरील एका बाधिताची नोंद झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले. १३१ सक्रिय रुग्णगुरूवारच्या अहवालानुसार नव्याने १६ रुग्ण आढळून आले तर ९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण १३१ रुग्ण सक्रिय आहेत. वाशिम ग्रामीण भाग निरंकगुरूवारच्या अहवालानुसार वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागात एकही रुग्ण आढळून आला नाही. शहरातील शुक्रवार पेठेत एक रुग्ण आढळून आला. मालेगावच्या ग्रामीण भागात दोन रुग्ण आढळून आले. रिसोडच्या ग्रामीण भागात सहा रुग्ण, मंगरूळपीर शहरात व ग्रामीण भागात प्रत्येकी एक, मानोºयाच्या ग्रामीण भागात एक तर कारंजा शहरात दोन व ग्रामीण भागात एक रुग्ण आढळून आला.
Corona Cases in Washim : आणखी १६ पॉझिटिव्ह; ९ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 5:58 PM