वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून शनिवार, १९ जून रोजी २० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर ७२ जणांनी कोरोनावर मात केली. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१२०६ वर पोहोचला आहे. दरम्यान, जिल्ह्यात झालेल्या एका व गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर झालेल्या एका अशा दोन मृत्यूची नोंद शनिवारी पोर्टलवर झाली आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाºयांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. शनिवारी नव्याने २० रुग्ण आढळून आले तर ७२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. वाशिम तालुक्यात सहा, रिसोड तालुक्यात पाच, मंगरूळपीर तालुक्यात दोन, कारंजा लाड तालुक्यात तीन आणि मानोरा तालुक्यात एक रुग्ण आढळून आला. आतापर्यंत ४१२०६ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०२२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत ६१४ जणांचे मृत्यू झाले. नागरिकांनी यापुढेही आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.
३६४ सक्रिय रुग्णशनिवारच्या अहवालानुसार नव्याने २० रुग्ण आढळून आले तर ७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ३६४ रुग्ण सक्रिय आहेत. शहर, ग्रामीणमध्ये प्रत्येकी १० रुग्णशनिवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात ग्रामीण भागात १० तर शहरी भागात १० असे २० कोरोना रुग्ण आढळले. मंगरूळपीर, मालेगाव व मानोरा शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही. कारंजा शहरात दोन तर रिसोड शहरात पाच रुग्ण आढळून आले. वाशिम शहरात तीन रुग्ण आढळून आले.