वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून मंगळवार, २२ जून रोजी २९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर ३३ जणांनी कोरोनावर मात केली. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१,२९१ वर पोहोचला आहे. दरम्यान आणखी एका मृत्यूची नोंद सोमवारी घेण्यात आली.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अत्यल्प झाले तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. मंगळवारी नव्याने २९ रुग्ण आढळून आले तर ३३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम तालुक्यात सात, रिसोड तालुक्यात चार, मालेगाव तालुक्यात पाच, मंगरूळपीर तालुक्यात एक, कारंजा लाड तालुक्यात आठ रुग्ण आढळून आला. आतापर्यंत ४१,२९१ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०३५० रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत ६१५ जणांचे मृत्यू झाले. जिल्ह्याबाहेरील ४ बाधितांची नोंद झाली. नागरिकांनी यापुढेही आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.
३२५ सक्रिय रुग्ण
मंगळवारच्या अहवालानुसार नव्याने २९ रुग्ण आढळून आले तर ३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ३२५ रुग्ण सक्रिय आहेत.