वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून रविवार, ४ जुलै रोजी ३३ जणांनी कोरोनावर मात केली तर १२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१,४७८ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. रविवारी नव्याने १२ रुग्ण आढळून आले तर ३३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रिसोड व कारंजा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम तालुक्यात ३, मंगरूळपीर तालुक्यात ४, मालेगाव तालुक्यात ३, मानोरा तालुक्यात २ असे रुग्ण आढळून आले. आतापर्यंत ४१,४७८ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०७१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंंत ६२० जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्याबाहेरील २ बाधितांची नोंद झाली आहे. १४० सक्रिय रुग्णरविवारच्या अहवालानुसार नव्याने १२ रुग्ण आढळून आले तर ३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण १४०रुग्ण सक्रिय आहेत. रिसोड, कारंजा निरंकरविवारच्या अहवालानुसार रिसोड व कारंजा तालुक्यात तसेच वाशिम शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिमच्या ग्रामीण भागात दोन रुग्ण आढळून आला. मालेगाव शहरात एक तर ग्रामीण भागात दोन रुग्ण, मंगरूळपीरच्या ग्रामीण भागात दोन रुग्ण, मानोरा शहरात दोन रुग्ण आढळून आले.0000000000
Corona Cases in Washim : ३३ जणांची कोरोनावर मात; १२ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 7:00 PM