वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून, गत दोन दिवसांत एकही मृत्यू नाही. मंगळवार, ८ जून रोजी नव्याने ७१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर १०८ जणांनी कोरोनावर मात केली. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४०७४३ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाºयांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. मृत्यूसंख्येतही घट येत असल्याचे आशादायी चित्र आहे. गत दोन दिवसांत जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद नाही. मंगळवारी नव्याने ७१ रुग्ण आढळून आले तर १०८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील ९ बाधितांची नोंद झाली आहे. रिसोड शहरात एकही रुग्ण आढळून आला नसल्याची नोंद सोमवारच्या अहवालात घेण्यात आली. आतापर्यंत कोरोनामुळे ५९१ जणांचा मृत्यू झाला तर ३९३०६ जणांनी कोरोनावर मात केली. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.
८८५ सक्रिय रुग्णमंगळवारच्या अहवालानुसार नव्याने ७१ रुग्ण आढळून आले तर १०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ८८५ रुग्ण सक्रिय आहेत.