वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून, कोरोनाबळींची संख्याही कमी होत असल्याचे दिसून येते. शनिवार, १२ जून रोजी आणखी एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर ३६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४०९९६ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाºयांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. मृत्यूसंख्येतही घट येत असल्याच चित्र आहे. शनिवारी आणखी एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. नव्याने ३६ रुग्ण आढळून आले तर ७६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील ३ बाधितांची नोंद झाली आहे. मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत ४०९९६ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ३९७०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत ५९८ जणांचे मृत्यू झाले. दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाचा धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.
६९४ सक्रिय रुग्ण
गुरूवारच्या अहवालानुसार नव्याने ३६ रुग्ण आढळून आले तर ७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ६९४ रुग्ण सक्रिय आहेत.