वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून, मृत्यूसत्र मात्र कायम असल्याचे दिसून येते. बुधवार २ जून रोजी आणखी तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर १०२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४०२७५ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाºयांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. मात्र मृत्यूसत्रात चढउतार असल्याने चिंताही कायम आहे. बुधवारी आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. बुधवारी नव्याने १०२ रुग्ण आढळून आले तर २४१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील ११ बाधितांची नोंद झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ५८६ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले. १८५१ सक्रिय रुग्णबुधवारच्या अहवालानुसार नव्याने १०२ रुग्ण आढळून आले तर २४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण १८५१ रुग्ण सक्रिय आहेत.
Corona Cases in Washim : आणखी तीन जणांचा मृत्यू; १०२ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 6:58 PM