विद्यार्थी-पालकांत अस्वस्थता: शासनाने दखल घेण्याची गरज
मंगरुळपीर: कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्याने सण, उत्सव जोमाने सुरू आहेत. राज्यात कोरोना नियम शिथिल झाल्याने अनेक व्यवहार सुरळीत सुरू आहेत; परंतु प्राथमिकच्या शाळा बंदच असल्याने विद्यार्थी-पालकांत अस्वस्थतेचे वातावरण पसरले असून, कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने आता शासनाने शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली आहे. दोन महिन्यापासून राज्यात सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. ग्रामीण भागातील बहुतांश गावे कोरोनामुक्त झाली आहेत. गेल्या दीड वर्षापासून नर्सरी, प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा बंद असल्याचा परिणाम लहान मुलांवर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी , शिक्षक आणि पालक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. विद्यार्थी घरी राहून आळशी झाले आहेत. त्यामुळे शासनाने आता शाळा सुरू कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.