शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

कोरोना संकटात चाचण्यांचा बाजार; अनेक ठिकाणी लूट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:41 AM

वाशिम : कोरोनाकाळात एकीकडे माणुसकीचा परिचय देत समाजातील अनेक सद्गृहस्थ मदतीसाठी पुढे येत आहेत तर दुसरीकडे काहीजण संधी साधत ...

वाशिम : कोरोनाकाळात एकीकडे माणुसकीचा परिचय देत समाजातील अनेक सद्गृहस्थ मदतीसाठी पुढे येत आहेत तर दुसरीकडे काहीजण संधी साधत रुग्णांसह नातेवाईकांची आर्थिक लूट करण्यातही मागे-पुढे पाहत नसल्याचे समोर येत आहे. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांकडून विविध प्रकारच्या चाचण्यांचा सल्ला दिला जातो. या चाचण्यांचे दर प्रत्येक पॅथालॉजी लॅबमध्ये वेगवेगळे असल्याने काही ठिकाणी रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचे दिसून येते.

वातावरणातील बदलामुळे साथरोग उद्भवत असून सर्दी, ताप, खोकला असल्यास विविध प्रकारच्या चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो. विषाणू संसर्गाचे प्रमाण नेमके किती आहे, याबाबतही काही चाचण्यांचा सल्ला दिला जातो. सीबीसी, सीआरपी, डी-डायमर, एलएफटी, केएफटी आदी स्वरुपांतील चाचण्यांचे दर प्रत्येक पॅथॉलॉजी लॅबमध्ये एकसमान असणे अपेक्षित आहे. बुधवारी चार ते पाच ठिकाणी पाहणी केली असता, या दरामध्ये तफावत असल्याने काही ठिकाणी रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचे दिसून येते. पॅथालॉजी लॅबमध्ये दर्शनीभागात दरपत्रक लावले जात नाही तसेच अधिकृत पावतीदेखील दिली जात नाही. याकडे जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने लक्ष देण्याचा सूर रुग्ण व नातेवाईकांमधून उमटत आहे.

००००

एजंटांची टक्केवारी वेगळीच

अधिकाधिक रुग्णांचे चाचणी नमुने तपासणीसाठी मिळावे यासाठी पॅथॉलॉजी लॅब संचालकांमध्येदेखील स्पर्धा असल्याचे पाहावयास मिळते. काही दवाखान्यांच्या परिसरात काही एजंट असून, टक्केवारीच्या मोबदल्यात ते या व्यवसायात जम बसवून असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. एका चाचणीसाठी २० ते ३० टक्के कमिशन असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक चाचणीचे दर वेगवेगळे असल्याचे दिसून येते. एजंटांच्या या टक्केवारीत रुग्ण व नातेवाईकांची मात्र आर्थिक पिळवणूक होत आहे.

००००

नियंत्रणच नाही; लूट सुरू

पॅथॉलॅॉजी लॅबमध्ये दरपत्रक नाही, पावती दिली जात नसल्याचे सर्वश्रूत असतानाही आरोग्य विभाग किंवा तालुका, जिल्हा प्रशासनाच्या चमूकडून पाहणी केली जात नसल्याने रुग्ण व नातेवाईकांची लूट सुरू आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन प्रत्येक चाचणीचे दर किती याबाबत दर्शनीभागात दरपत्रक लावण्याचे निर्देश संबंधित पॅथॉलॉजी लॅबला दिले तर रुग्णांची लूट थांबेल, असा सूर उमटत आहे.

००००००

चाचणी लॅब १लॅब २लॅब ३

सीबीसी - २०० २०० २५०

सीआरपी ३०० ३०० ३००

डी_ डायमर ११०० १००० ११००

एलएफटी - ६०० ६५० ७००

केएफटी ३०० ७०० ३५०