जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. मृत्यूसंख्येतही घट येत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी आणखी एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली. नव्याने २७ रुग्ण आढळून आले तर, ८६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील ४ बाधितांची नोंद झाली आहे. मंगरुळपीर शहरात तसेच मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत ४१,१०० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ३९,९५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर, आतापर्यंत ६०२ जणांचे मृत्यू झाले. नागरिकांनी यापुढेही आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले आहे.
००००
५३९ सक्रिय रुग्ण
मंगळवारच्या अहवालानुसार, नव्याने २७ रुग्ण आढळून आले तर ८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ५३९ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000
वाशिम तालुक्यात तीन रुग्ण
मंगळवारच्या अहवालानुसार वाशिम तालुक्यात तीन रुग्ण आढळून आले. मालेगाव शहरात एक तर ग्रामीण भागात एक रुग्ण आढळून आला. कारंजा शहरात एक तर ग्रामीण भागात दोन रुग्ण आढळून आले. रिसोड शहरात सात तर ग्रामीण भागात सहा रुग्ण, मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.