शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

कोरोनामुळे मोफत प्रवेश प्रक्रिया लांबणीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 5:07 AM

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग, मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सर्व माध्यमांच्या खासगी, विनाअनुदानित व ...

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग, मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सर्व माध्यमांच्या खासगी, विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये पहिल्या वर्गात २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी राज्यातील ९,४३२ शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी ९६ हजार ६८४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकूण ९६ हजार ६८४ जागांकरिता २ लाख २२ हजार ५८४ बालकांनी ऑनलाइन अर्ज केले होते. ७ एप्रिलला पुण्यातून एकाच वेळी लॉटरी काढली असून, यामध्ये ८२ हजार १२९ बालकांची निवड करण्यात आली. मात्र, त्यानंतर कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध कठोर करण्यात आल्याने आणि संचारबंदीही लागू केल्याने प्रवेश प्रक्रिया प्रभावित पडली. ३० एप्रिलनंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ववत होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. परंतु, १५ मेपर्यंत संचारबंदीला मुदतवाढ दिल्याने प्रवेश प्रक्रिया आणखी लांबणीवर पडली आहे. पुढील आदेशापर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित असून, पडताळणी समितीकडे पालकांना जाऊ नये, अशा सूचनाही शिक्षण विभागाने दिलेल्या आहेत. पहिल्या सोडतीमध्ये वाशिम जिल्ह्यातील ६३० बालकांची निवड झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निवड प्रक्रिया राबविली जाईल, असे सांगितले जात आहे. तूर्तास बालकांसह पालकांना मोफत प्रवेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

०००००००००००००००

जिल्ह्यातील १०३ शाळांमधील ७०९ जागांकरिता पहिल्या सोडतीत ६३० बालकांची निवड झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे प्रवेश प्रक्रिया तूर्तास थांबविण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. तोपर्यंत पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊ नये.

- गजानन डाबेराव, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक, वाशिम