५ मार्च रोजीच्या अहवालानुसार वाशिम शहरातील पाटणी चौक, काटा रोड, ईश्वरी कॉलनी,पोलीस स्टेशन, चंडिकावेस, पुसद नाका, विनायक नगर, सामान्य रुग्णालय परिसर, जुनी नगर परिषद परिसर, तामसी, हिवरा येथील प्रत्येकी एक, काळे फाईल, सिव्हील लाईन्स, गवळीपुरा, सायखेडा, तोंडगाव, तोरणाळा, धानोरा मापारी येथील प्रत्येकी दोन, मोहजा रोड येथील चार रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रिसोड तालुक्यात शहरातील तीन व नावली येथे एक, मंगरूळपीर तालुक्यात शहरातील सुभाष चौक, अशोक नगर, राजस्थानी चौक, प्रगतीनगर, नवीन सोनखास, बेलखेड, हिसई, शहापूर, पोघात, शेंदूरजना, वनोजा, माळशेलू येथील, बोरवा आणि रामगड येथील प्रत्येकी एक, वाडा फार्म येथील ४, शेलूबाजार येथील ३, मोहरी, पेडगाव, गोलवाडी येथील प्रत्येकी दोन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. तसेच कारंजा तालुक्यात नागरवाडी, मनभा, बेंबळा येथे प्रत्येकी एक, धनज बु., धनज, राहटी, उंबर्डा बाजार येथे प्रत्येकी दोन; तर कामठवाडा येथे तीन नवे रुग्ण आढळले.
मालेगाव शहरात नगरपंचायत जवळ ४, गांधी चौक येथे ३, माळी वेटा येथील ४, शिक्षक कॉलनी येथील ३, शिव चौक येथील १, देशपांडे प्लॉट येथील ३, वार्ड क्र. १० येथे ३, वार्ड क्र. १६ येथे १, गांधी नगर येथे ५, जाटगल्ली येथे १, वार्ड क्र. ८ येथे १, कोर्टासमोरील परिसरात एक, गोकुळधाम येथील १, टिपू सुलतान चौक येथील १, वार्ड क्र. १ येथील १, शेलू फाटा येथील २, अकोला फाटा येथील ५, माहेश्वरी भवन येथील १, बियाणी नगर येथील १, दुर्गा चौक येथील ५, पांडे वेटाळ येथे १, तेली वेटाळ येथे १, मुंगसाजी नगर येथे १, सोनारगल्ली येथील २, सिद्धेश्वर कॉलनी येथे १, गीता नगर येथील १, स्वामी समर्थ मंदिर परिसरातील १, पाण्याची टाकीजवळील १, मर्कस मस्जिद जवळील १, दत्त मंदिर जवळील १, वार्ड क्र. ४ येथील १, सहारा पार्क येथील २, सराफा गल्ली येथील १, वार्ड क्र. १७ येथील १, महसूल कॉलनी येथील १, जामा मस्जिद परिसरातील १, गणपती मंदिर परिसरातील १, गोयंका नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १८, नागरतास येथील २, दुधाळा येथील १, मारसूळ येथील १, जांभरूण परांडे येथील १, इराळा येथील २, पांगरी येथील १, डही येथील १, बोरगाव येथील १, कुराळा येथील १, वडप येथील २, आमखेड येथील १, अमानी येथील १, बोर्डी येथील १, शिरपूर येथील १, डोंगरकिन्ही येथील २, पांगराबंदी येथील १, जऊळका येथील ८, बोराळा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा आता ९ हजार ७३३ वर पोहोचला असून १३९२ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत; तर ८ हजार १७८ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. मृतांचा आकडा आता १६२ झाला आहे.