आराेग्य विभागाच्या अंदाजानुसार तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धाेकादायक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनासह आराेग्य विभागाकडून करण्यात येत आहे. काेराेना संसर्ग राेखण्यासाठी लसीकरण व काेराेना नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व आराेग्य विभागाने केले आहे.
..............
पालिकेच्या ६ पथकांची असेल नजर
१. काेराेना संसर्ग राेखण्यासाठी पालिकेने अनेक उपाययाेजना आखल्या असून सद्यस्थितीत सहा पथके कार्यरत आहेत. या सहा पथकांव्दारे काेराेना संसर्ग राेखण्याचे नियाेजन केले जात आहे.
२. काेराेना संसर्ग राेखण्यासाठी वाशिम नगरपरिषदेतर्फे प्रभागानुसार लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचे नियाेजनही करण्यात आले असून ३ ते ४ जूनपासून प्रभागातील नागरिकांचे काेराेना लसीकरण करण्याची माेहीम सुरू करण्यात येणार आहे.
३. दुकानातील गर्दी टाळण्यासाठी तसेच दुकानदारांनी काेराेना चाचणी केली किंवा नाही याच्या तपासणीसाठी वेगळे एक पथक असल्याचे मुख्याधिकारी दीपक माेरे यांनी सांगितले.
४. वर्दळीच्या ठिकाणी व गर्दी हाेत असलेल्या ठिकाणी वाशिम नगरपरिषदेतर्फे काेराेना चाचणी करून घेतली जात आहे. याकरिता आराेग्य विभाग सहकार्य करीत आहे.
........................
१. निर्बंध शिथिल केल्यानंतर नागरिक काेराेना संसर्ग संपुष्टात आला की काय या आविर्भावात वागताना दिसून आले.
२. लग्न समारंभामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली. काेणत्याही प्रकारचे काेराेना नियमांचे पालन केले नाही.
३.गृह विलगीकरणात असलेले रुग्ण बिनधास्त बाहेर फिरले. याप्रकरणी कारवाई सुद्धा झाली. यामुळे संसर्गात वाढ झाली.
४. पाेलिसांकडून दंड वसूल करण्यात आल्यानंतरही अनेक नागरिकांनी विविध कारणे पुढे करून मास्कचा वापर टाळला.
५. काेराेना संसर्ग राेखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून केल्यानंतरही अनेकांनी याचे पालन केले नाही.
............