वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात कोरोना संसर्ग रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. २२ फेब्रुवारीपर्यंत १४१ रुग्ण संख्या होती. तर २३ फेब्रुवारी रोजी आलेल्या सायंकाळच्या अहवालात कारंजा शहरासह ग्रामीण भागातसुद्धा ३० रुग्ण संख्येने वाढ झाली आहे. यामध्ये बाबरे काॅलनी १, अमर चाैक १, जुना सरकारी दवाखाना १, गणपतीनगर १, वनदेवीनगर १, यशवंत काॅलनी १, गवळी पुरा १, शहरातील इतर ठिकाणचे २, शांतीनगर १, शिवाजीनगर १ तर ग्रामीण भागातील धजन येथील ९, राहटी येथील १, बेलखेड येथील २, धामणी येथील २, उंबर्डा बाजार येथील ४ आणि कामठवाडा येथील १ अशा एकूण ३४ जणांचा समावेश आहे. कारंजा शहरात व ग्रामीण भागात रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पानटपऱ्यावर गुटखा विकला जात आहे. या ठिकाणी गर्दी होत राहते. त्यामुळे कोरोना संसर्गाचासुद्धा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. गुटखा खाणारे कुठेही थुंकत असल्याने कोरोना संसर्गाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या दुकानदारांवर व गर्दी करणाऱ्या नागरिकांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन ५१ ब साथरोग अधिनियम १८९७ कलम २, ३ व ४ भा.दं.वि. कलम १८८, २६९, २७० व २७१ अन्वये कारवाई करण्याबाबत मुख्याधिकारी नगर परिषद व गटविकास अधिकारी यांना सूचित केले आहे.
- धीरज मांजरे, तहसीलदार