कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याकरिता जिल्हा प्रशासनाने विविध स्वरूपातील प्रभावी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याअंतर्गत ९ मे पासून जिल्हाभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्यास केवळ सकाळी ७ ते ११ या चार तासांचा अवधी देण्यात आला आहे. दुसरीकडे जिल्हाभरात कोरोना चाचण्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढविण्यासोबतच ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. असे असतानाही रुग्णसंख्येचा आलेख म्हणावा तसा उतरलेला नाही. दरम्यान, आज प्राप्त अहवालानुसार वाशिम तालुक्यात ६४, मालेगाव तालुक्यात ८२, रिसोड तालुक्यात ४९, मंगरूळपीर तालुक्यात ५०, कारंजा तालुक्यात ६४ आणि मानोरा तालुक्यात ५० असे एकूण ३८२ रुग्ण आढळले आहेत. त्यात जिल्ह्याबाहेरील २३ रुग्णांचा समावेश असून ३८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
..................
कोरोना बाधितांची सद्य:स्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ३७६५९
अॅक्टिव्ह – ४०४६
डिस्चार्ज – ३३२१९
मृत्यू – ३९३