वाशिम : कोरोनाकाळात निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी, मोबाईल वेड, मानसिक समस्या व निराशा यासह विविध कारणांमुळे अनेकांना निद्रानाशेचा त्रास जाणवू लागला आहे. पुरेशी झोप झाली नाही तर त्याचा मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो.
कोरोनाने सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत तसेच काही आरोग्यविषयक समस्याही निर्माण होत आहेत. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार हिरावला, लघु व्यवसाय ठप्प झाले, आर्थिक अडचणी वाढल्या याबरोबरच घरातच राहावे लागत असल्याने मुलांना मोबाईल वेडही जडले. टेन्शन, मानसिक ताण, नियमित व्यायाम व सकस आहाराचा अभाव आदी कारणांमुळेदेखील पुरेशी झोप होत नाही. निरोगी आरोग्यासाठी वयोगटानुसार किती तास झोप असावी, याबाबत आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनाही आहेत. कमी झोप झाली तर रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, भूक कमी होणे यासह विविध आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. त्यामुळे वेळीच सावध होऊन निरोगी आरोग्यासाठी पुरेशी झोप होईल, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असा सल्ला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.
०००००
नेमकी झोप किती हवी
नवजात बाळ - १२ ते १६ तास
एक ते पाच वर्षे - १२ ते १४
शाळेत जाणारी मुले - ८ ते १०
२१ ते ४० -६ ते ८
४१ ते ६० - ६ ते ८
६५ पेक्षा जास्त - ५ ते ६
००००००००००००००
झोप का उडते
१) विविध कारणांमुळे झोप उडते. आर्थिक यासह विविध गंभीर स्वरुपाच्या अडचणी, मानसिक चिंता, हार्मोन्स कमी होणे, टेन्शन आदी कारणांमुळे झोप येत नाही तसेच झोप उडते.
२) मेंदू विकार, खोलीत लख्ख प्रकाश, गोंगाट किंवा आवाज आदी कारणांमुळेदेखील झोप उडू शकते.
३) जास्त वेळ टीव्ही बघणे, मोबाईलवर खेळत राहणे, हार्मोन्स कमी होणे, सकस आहाराचा व नियमित व्यायामाचा अभाव यामुळे झोप येत नाही.
०००००००००००
झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम
रोगप्रतिकारशक्ती कमी होणे.
आजाराशी लढण्याची शक्ती कमी होणे.
भूक कमी होणे, थकवा जाणवणे.
मानसिक समस्या निर्माण होणे.
०००००००००००००००
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी नको !
विविध कारणांमुळे झोप येत नसेल तर कधी कधी अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार झोपेची गोळी घेतात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी घेणे आरोग्यासाठी हानीकारकही ठरू शकते. झोपेची गोळी काही वेळेला घेतली तर या गोळ्यांची सवयही जडू शकते. त्यामुळे सल्ल्याशिवाय झोपेची गोळी घेऊ नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले.
०००००००००००००००
चांगली झोप यावी म्हणून..
झोपण्यापूर्वी आवडीचे संगीत, गाणे ऐकावे.
नियमित व्यायाम व सकस आहार असावा.
उष्ण पदार्थांचे सेवन टाळावे.
ताणतणाव नसावा. एखादा छंद जोपासावा.
०००००००००००००
कोट बॉक्स
झोपेवर मानवाचे आरोग्य अवलंबून आहे. चांगली झोप झाली तर शरीराच्या हार्मोन्सवर चांगले परिणाम होतात. हार्मोन्स व पर्यायाने पचनक्रिया वाढते. प्रत्येक पेशीची कार्यक्षमता वाढते. झोप कमी झाली तर रोगप्रतिकारशक्तीही कमी होते.
- डॉ. मंगेश राठोड
मानसोपचारतज्ज्ञ, वाशिम.
००००००००
० ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या निरोगी जीवनासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. मुलांना शक्यतोवर मोबाईल, टीव्हीपासून दूर ठेवावे. पुरेशी झोप झाली नाही तर याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
- डॉ. रत्नेश परळकर
बालरोगतज्ज्ञ,