लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवारी रुग्णसंख्येने तीन हजाराचा टप्पा ओलांडला. दिवसभरात १६५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे १५ सप्टेंबर रोजी निष्पन्न झाले. दरम्यान, १६७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना मंगळवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.सप्टेंबर महिन्यातही रुग्णसंख्या वाढीचा वेग अधिकच वाढला असून, बुधवारी यामध्ये आणखी १६५ रुग्णांची भर पडली. यामध्ये वाशिम शहरातील ४३, जांभरूण १, शिरपुटी येथील ९, केकतउमरा येथील २, सोयता येथील १, एरंडा येथील १, धुमका येथील १, देपूळ येथील २, दुधखेडा येथील ६, मोरगव्हाण येथील १, कोंडाळा महाली येथील १, सोनखास येथील १, अनसिंग येथील १, काटा येथील १, कारंजा शहरातील २, माळीपुरा येथील ४, रंगारीपुरा येथील १, शिक्षक कॉलनी १, शांतीनगर १, हातोदीपुरा १, सहारा कॉलनी येथील १, मानक नगर येथील १, गुरु मंदिर जवळील १, गांधी चौक परिसर २, बालाजी नगर येथील ३, चंदनवाडी येथील २, मालेगाव शहरातील ११, पांगरी नवघरे ५, शिरपूर जैन येथील १, सोनाळा १, आमगव्हाण येथील १, वसारी येथील २, पांगरी कुटे येथील १, मानोरा तालुक्यातील दापुरा ५, रिसोड शहरातील जी. बी. लॉन परिसरातील २, सराफा लाईन १४, सिव्हील लाईन १, आंबेडकर नगर १, पंचवटकर गल्ली १, गोवर्धन ७, रिठद येथील १, मसला पेन येथील १, हिवरा पेन येथील २, गणेशपूर येथील ५, केनवड येथील २, मंगरूळपीर शहरातील ३, शेलूबाजार येथील २, निंबी येथील २, जांब येथील १ अशा रुग्णांचा समावेश आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३०४१ झाली असून, यापैकी २१२८ जणांनी कोरोनावर मात केली. आता ८५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.