शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

वाशिम जिल्ह्यात पुन्हा आढळला कोरोनाचा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 12:42 PM

६० वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल ३ जून रोजी सकाळी पॉझिटिव्ह आला.

वाशिम : नवी मुंबई येथून मानोरा तालुक्यातील भोयणी येथे परतलेल्या एका ६० वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल ३ जून रोजी सकाळी पॉझिटिव्ह आला. यामुळे मानोरा तालुका प्रशासनासह आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून, भोयणी गाव सील करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली.जिल्ह्यातील मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. त्यानंतर उत्तरप्रदेशमधील कोरोनाबाधीत ट्रकच्या क्लिनरचा वाशिममध्ये मृत्यू झाला. त्याच ट्रकचा चालक कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले होते. मेडशी येथील एक रुग्ण व ट्रक चालकाने कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आले. त्यानंतर १५ मे रोजी मालेगाव येथील एक महिला कोरोनाबाधित असल्याचे आणि १९ मे रोजी या महिलेच्या संपर्कातील पाच जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यापैकी एका रुग्णाचा २६ मे रोजी मृत्यू झाला तर उर्वरीत पाच रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. १९ मे पासून जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता. दरम्यान वाशी (नवी मुंबई) येथून मानोरा तालुक्यातील भोयणी येथे २८ मे च्या दरम्यान परतलेल्या एका ६० वर्षीय महिेलेला सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असल्याने मानोरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात दाखल करून १ जून रोजी तिचा थोट स्वॅब नमुना तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आला होता. याचा अहवाल ३ जून रोजी प्राप्त झाला असून, सदर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेसह मानोरा तालुका प्रशासन अलर्ट झाले. भोयणी येथे तहसिलदार डॉ. सुनील चव्हाण यांच्यासह पोलीस व आरोग्य यंत्रणेने भेट देऊन गाव सील करण्याची कार्यवाही सुरू केली. या महिलेच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. कोरोनाबाधित रुग्णाचे गावात १४ दिवसांसाठी आरोग्य कर्मचाºयांमार्फत सर्वे केला जाणार आहे. त्या गावचा एरिया सील केला जाणार असून, ज्या ठिकाणी संबंधित रुग्ण वावरला, त्या ठिकाणी हायड्रोक्लोराईड सोल्यूशनची फवारणी केली जाणार आहे. संबंधित गावात कुणी येणार नाही तसेच गावातून कुणी बाहेर जाणार नाही, याची दक्षता घेतली जाणार, असे विश्वसनीय सूत्राने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिमManoraमानोरा