जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका अजून कायम आहे. त्यासोबतच सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू यासारखे साथीचे आजार उद्भवण्याचा धोका आहे. कोरोना आणि डेंग्यूची प्राथमिक लक्षणे सारखीच आहेत. सर्दी, खोकला, ताप येणे आणि थंडी वाजणे अशी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तातडीने कोरोना आणि डेंग्यूची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
-----
चाचणी कुठली ?
-कोरोनासाठी: एचआरसीटी चाचणी
-डेंग्यूसाठी : आयजीएम चाचणी
---------
सर्दी, ताप खोकला
१) कोरोनाची प्राथमिक लक्षणे ही सर्दी, खोकला ताप येणे ही आहेत. दोन ते तीन दिवस अंगातील ताप हा कमी होतो आणि पुन्हा वाढतो. वास येत नाही, चव लागत नाही, ही लक्षणे दिसून येतात.
२) डेंग्यूची प्राथमिक लक्षणे ही ताप, सर्दी, खोकला, थंडी वाजून येणे, मळमळ, उलट्या होणे, अंगातील ताप वाढत जाऊन थंडीदेखील वाजते, अंग दुखणे, गळून जाणे यासारखी लक्षणे दिसून येतात.
३) कोरोना झालेल्या रुग्णांच्या फुफ्फुसाला संसर्गाने बाधा पोहोचते. त्यासाठी सिटीस्कॅनव्दारे एचआरसीटी ही चाचणी करावी लागते. त्यानंतर रुग्णांवर कोरोनाचे उपचार केले जातात.
४) डेग्यू झालेल्या रुग्णाच्या मेंदूमध्ये ताप उतरतो. त्यासाठी तातडीने डेंग्यूसाठी आयजीएम चाचणी करून घेणे आवश्यक आहे.
-----------
पाणी उकळून प्या, डासांपासून सावध राहा
१) कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरणासह मास्कचा वापर, गर्दी टाळणे, कामाशिवाय घराबाहेर न पडणे, सॅनिटायझरने हात धुणे आवश्यक आहे.
२) डेंग्यूपासून सुरक्षेसाठी पाणी उकळून पिणे, बाहेरचे पदार्थ खाणे टाळणे आवश्यक आहे. डासांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे.
३) पाण्यामध्ये अॅबेट, तुरटी टाकणे, घराचा परिसर स्वच्छ ठेवणे, हे घरगुती उपाय नागरिकांनी करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
-----
जिल्हा आरोग्य अधिकारी कोट
कोट : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. सोबतच मलेरिया, डेंग्यूची साथ पसरण्याचा धोका आहे. कोरोना आणि डेंग्यूची प्राथमिक लक्षणे सारखीच आहेत. सर्दी, खोकला, ताप येणे आणि थंडी वाजणे अशी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तातडीने कोरोना आणि डेंग्यूची चाचणी करून घ्यावी.
- डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम
^^
डेंग्यूचे रुग्ण
२०१९- २५
२०२० -०७
२०२१ -०९