कोरोनामुळे करवसुली प्रभावित होत असल्याने ‘आमदनी अठण्णी , खर्चा रुपय्या' अशी म्हणण्याची वेळ नगरपंचायतीवर येऊन ठेपली आहे. नवीन विकासकामांनादेखील प्रशासकीय स्तरावर ब्रेक लागला आहे. १७ सदस्य असलेल्या येथील नगरपंचायतीला गेल्या १४ महिन्यांपासून कोरोना महामारीचा सामना करावा लागत आहे . गावात भरणारी बाजारपेठ बंद
झाली आहे . शेती हंगामातील खरेदी विक्री बंद झाल्याने आर्थिक व्यवहार थांबले आहेत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.स्थानिक करातून मिळणारे उत्पन्न बंद झाल्याने नगरपंचायतीची वाईट अवस्था झाली आहे. वसुली नाही, तर कर्मचाऱ्यांना पगारदेखील नियमित नाही. नागरिकांना उत्पन्न नसल्याने कोणीही कर भरणा करीत नाही . या परिस्थितीमुळे नगर पंचायतसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.