^^^
आठवडाभरात १,५०० कोरोना योद्ध्यांना लस
वाशिम : तालुक्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढतच आहेत. यासाठी कोरोना योद्ध्यांना १६ जानेवारीपासून कोरोना लस दिली जात असून, या आठवड्यात १,५०० जणांनी ही लस घेतली.
------
कोविड केअर सेंटरमधील जेवण निकृष्ट
वाशिम: वाशिम तालुक्यातील कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये निकृष्ट जेवण मिळत असल्याच्या तक्रारी या सेंटरमध्ये दाखल व्यक्तींनी रविवारी भ्रमणध्वनीवर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत.
----------------------
कृषी विभागाच्या योजनांसाठी अर्ज वाढले
वाशिम : ‘अर्ज एक योजना अनेक’ या अंतर्गत महाडीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीनंतर कृषी विभागाच्या योजनांसाठी अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तीन दिवसांत ६०० शेतकऱ्यांनी यात अर्ज केले.
---------------------