.................
मेडशीत लाकडांचा वापर वाढला
वाशिम : उज्वला योजनेअंतर्गत गॅस-सिलींडर मिळाल्यानंतर गोरगरिब कुटुंबातील महिलांनी चुली बंद करून गॅसवर स्वयंपाक करणे सुरू केले; मात्र गेल्या काही दिवसांत सिलींडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने चुली सुरू होऊन लाकडांचा वापर वाढल्याचे दिसत आहे.
...............
जऊळका येथे स्वच्छतेची मागणी
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे गावातील काही भागात अस्वच्छता पसरलेली आहे. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष पुरवून सदोदित स्वच्छता ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
............
मालेगावात मुख्य रस्त्याची दुरवस्था
वाशिम : मालेगाव शहरातील पोलीस स्टेशनसमोरील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याचठिकाणी खासगी वाहने व एस.टी.उभी राहून प्रवाशांची ने-आण करतात. रस्ता दुरवस्थेने गैरसोय होत असून दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.
............
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाने बाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेऊन नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. मधुकर राठोड यांनी केले आहे.