------------------
प्रशासनाच्या निर्बंधांचे कठोर पालन
वाशिम: राज्यात आढळत असलेले डेल्टा प्लसचे रुग्ण लक्षात घेता शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लावण्यात आले. यात कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरात निर्बंधांचे कठाेर पालन होेत असल्याचे २९ जुलै रोजी दिसून आले.
^^^^^^^^
अवैध दारूविक्रीवर छापे
वाशिम: कामरगाव परिसरातील गावांत अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर धनज पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. त्यात गत आठवडाभरात विविध ठिकाणी छापे मारून कारवाई केली. अवैधरित्या दारूविक्री करीत असल्याचे पोलिसांनी छापा टाकत दारू जप्त केली.
---------------
निर्जंतुकीकरणावर ग्रामपंचायतींचा भर
वाशिम: कोरोना संसर्ग नियंत्रणात असताना शासनाने कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू केल्या आहेत. आता गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी ग्रामपंचायती आठवड्यातून दोन वेळा निर्जंतुकीकरण करीत आहे. ट्रॅक्टरवर फवारणी यंत्र बसवून जंतुनाशक औषधी फवारण्यात येत आहे.
---------------
कोरोना नियमांबाबत मार्गदर्शन
वाशिम: उंबर्डा बाजार जिल्हा परिषद गटात कोरोना नियंत्रणासाठी व्यापक उपाययोजना केल्या जात आहे. या अंतर्गत सोमवारी काही गावांत ग्रामस्थांना कोरोना नियमांबाबत मार्गदर्शन करून सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.
--------
इंझोरीच्या बाजारपेठेत शुकशुकाट
वाशिम : शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने नवी नियमावली लागू केली. त्यात इंझोरी येथे सायंकाळी ४ पूर्वीच अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता अन्यत्र सर्व दुकाने बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे.
^^^^^^^^^^^^^^
दगड उमऱ्यात अनियमित वीज पुरवठा
वाशिम : कोेरोना विषाणू संसर्गावर नियंत्रणासाठी लागू नियमांमुळे ग्रामस्थांना सायंकाळपासून घरात थांबावे लागत आहे. त्यात दगड उमरा परिसरात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.