मानोरा : मानोरा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या पिंपळशेंडा या १०० टक्के आदिवासी बहुल गावात अखेर १ जून रोजी कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात आले. ‘पिंपळशेंडा येथे एकानेही घेतली नाही लस’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने ३१ मे रोजी वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष.
पिंपळशेंडा येथे जिल्हा परिषद शाळेत शिबिर आयोजित करण्यात आले होते. ७० लाभार्थी (४५ वर्षांवरील) पैकी केवळ ७ लोकांनी लस घेतली. ‘पिंपळशेंडा येथे एकानेही घेतली नाही लस’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने ३१ मे रोजी वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल म्हणून पिंपळशेंडा येथे लसीकरण शिबिर घेण्यात आले. या गावात १०० टक्के आदिवासी बहुल समाज आहे. येथे जिल्हा परिषदेची एक शिक्षकी शाळा आहे. गावाची एकूण लोकसंख्या ३५० आहे. पुरेशा प्रमाणात जनजागृती नसल्याने येथे लसीकरण मोहिमेला प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येते. समुदाय आरोग्य अधिकारी वाईगौळ डॉ. सैयद अझर, आरोग्य सेविका किरण उगे, मदतनीस शोभा दशपुते, मुख्याध्यापक हेमंत गावंडे, संगणक चालक रणजीत जाधव, कोतवाल संतोष जाधव, पोलीस पाटील रामहरी बल्लाळ, अंगणवाडी सेविका शोभा मनवर, मदतनीस कांताबाई पारधी, स्वस्त धान्य दुकानदार अरुण बल्लाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन बल्लाळ, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बल्लाळ यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.
००
कोट
पिंपळशेंडा हे गाव १०० टक्के आदिवासी बहुल आहे. ४५ वर्षांवरील लाभार्थी केवळ ७० आहे. लसीकरण करावे याकरिता आम्ही केंद्रप्रमुख संध्या पार्डीकर यांच्या मार्गदर्शनात जनजागृती केली. लोकांना फायदा सांगितला. परंतु लोक लस घेण्याकरिता उदासीन आहेत. लस घेतली तर आजारी पडू, काही होईल तर नाही ना अशी भीती त्यांच्यात आहे. म्हणून आज गावातील प्रतिष्ठित नागरिकांना लस दिली. पुढे चांगला प्रतिसाद मिळेल.
हेमंत गावंडे मुख्याध्यापक, जि.प. शाळा