जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. ‘फ्रंटलाइन वर्कर्स’ म्हणून काम करणारे महसूल, पोलीस अधिकारी-कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनात काम करणारे कर्मचारी यांना कोरोनाची लस दिली जात आहे. याकरिता अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावनोंदणीची कार्यवाही करून त्यांना लसीकरणासाठी मोबाइलवर संदेश पाठविले जात आहेत. कोरोना लसीबाबतची शंका दूर करण्यासाठी पोलीस अधीक्षक परदेशी यांनी शनिवारी स्वत: लस घेतली.
..................
कोट :
कोरोना संसर्गाचे संकट अद्याप संपलेले नाही. त्यामुळे भविष्यात कोरोनाला स्वत:पासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधक लस पूर्णत: सुरक्षित असून, कोणतीही भीती अथवा शंका न बाळगता ‘फ्रंटलाइन वर्कर्स’ म्हणून काम करणारे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी लस घ्यावी.
- वसंत परदेशी
जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम