शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

कोरोना योद्धेच असुरक्षित; इतरांना कशी सुरक्षा प्रदान करणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 12:25 PM

Washin News नोंदणी होऊनही १० हजार ५४१ कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ४ हजार १६७ जणांनी अद्याप लस घेतलेली नाही.

- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट दाराशी येऊन ठेपली आहे. त्याचा सामना करण्यासाठी कोरोना योद्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी २२ हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले; मात्र लस घेण्यासाठी रीतसर नोंदणी होऊनही १० हजार ५४१ कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ४ हजार १६७ जणांनी अद्याप लस घेतलेली नाही. त्यामुळे हे कोरोना योद्धेच असुरक्षित असल्याने ते इतरांना सुरक्षा कशी प्रदान करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान ‘कोविशिल्ड, कोव्हॅक्सीन’ चे १७ हजार डोज आजरोजी शिल्लक आहेत.२०२० च्या सुरुवातीला उद्भवलेल्या कोरोना विषाणू संसर्गाने दूरगामी परिणाम केले आहेत. या संसर्गाची दुसरी आणि तुलनेने अधिक तीव्र लाट आता येऊन ठेपली आहे. नजिकच्या अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये दैनंदिन आढळत असलेल्या कोरोना रुग्णांची व मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या दिवसागणिक वाढत आहे. वाशिम जिल्ह्यातही कोरोनाने बाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी, समाजातील प्रत्येकाला त्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य, पोलीस, महसूल, नगर परिषदांमधील ‘फ्रंट लाईन वर्कर्स’ म्हणून काम करणाऱ्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन शासन-प्रशासनाकडून केले जात आहे.    दरम्यान, कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्यांना आधी सुरक्षा प्रदान करण्यासाठी लसीकरणासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार, शासकीय आरोग्य संस्थांमधील ४१५० आणि खासगी रुग्णालयांमधील १८५८ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद करून त्यांना कोरोना लस देण्याचा कार्यक्रम १६ जानेवारीपासून सुरू झाला. असे असले तरी शासकीय आरोग्य संस्थांमधील १३३८ आणि खासगीमधील १०३७ कर्मचाऱ्यांनी अद्याप लस घेतलेली नाही. यासह पोलीस विभागातील २१२७ पैकी १५९७ कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असून ५३० कर्मचारी अद्याप बाकी आहेत. नगर परिषद व नगर पंचायतींमधील ६३६ कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी निवड झाली त्यातील ४२६ जणांनी लस घेतली असून २१० जण अद्याप लसीपासून दूर आहेत. महसूल विभागातील ९१० पैकी ४०४ कर्मचाऱ्यांचे लसीकरण अद्यापपर्यंत झालेले नाही. यासह खासगी क्षेत्रातील ‘फ्रन्ट लाईन वर्कर्स’ म्हणून नोंद असलेल्या ८६० जणांपैकी २१२ जणांनी लस घेतली असून ६४८ जण अद्यापही लस न घेणाऱ्यांमध्ये समाविष्ट आहेत. संबंधितांना कोरोनापासून बचावाकरिता दोन डोज घ्यावे लागणार आहेत; मात्र ४१६७ जणांनी अद्यापपर्यंत पहिला डोजच घेतला नसल्याने ते दुसरा डोज घेऊन ही प्रक्रिया कशी पूर्ण करणार आणि समाजातील सर्वसामान्य रुग्णांचे कसे रक्षण करणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसwashimवाशिम