कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पी.आर.राजपूत यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी कार्यक्रमाला तहसीलदार धीरज मांजरे, व्यवस्थापन समितीच्या उर्मिलाबाई ठाकूर, प्रकाश गोलेच्छा, उपप्राचार्य डाॅ. डी.आर.हळवे यांची उपस्थिती होती. यावेळी कोरोना शहरात व परिसरात अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून काम करणारे तहसीलदार धीरज मांजरे, डाॅ. अजय कांत, अनघा कांत, डाॅ. सुषमा उपाध्ये, डाॅ. संजय किटे, डाॅ. विजय जवाहरमलाणी, अशोक मानकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच काेरोना काळात मृत झालेल्या व्यक्तींना अंतिम संस्कार करणारे ऋषिकेश कामदार, नितीन जाधव, रोशन वानखडे, गौरव राऊत, लखन शिवहरे व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आर.एच.माथुरकर, प्रा.एन.जी.जाधव, प्रा.कु.एस.डी.वंजाळकर, यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. त्यानंतर युवक बिदादरीत प्रथम क्रमांक प्राप्त करणारी चमू व अमित मिरजकर, सुमित भगत यासमवेत प्रा.व्ही.आर.ढेगळे यांचा ही सन्मान करण्यात आला. महाविद्यालयात प्रोफेसर पदावर पोहाेचलेले डाॅ.डी.आर.हळवे, डाॅ.आर.ए.गुल्हाणे, डाॅ. के.जी.राजपूत, डाॅ. आर.ए.पाटील व डाॅ. ए.एन.देवरे तसेच मनोहर राऊत, देवानंद बोंते, चंदन वासनिक यांचाही सन्मान करण्यात आला.