वाशिम : आॅक्टोबर महिन्यातील सुरूवातीच्या सात दिवसात जवळपास ३०० जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. यापूर्वीच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आॅक्टोबर महिन्यात कोरोनाचा आलेख घसरल्याचे दिसून येते. परंतू, धोका अद्याप टळला नसल्याने कोरोनासंदर्भात प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. सप्टेंबरच्या सुरूवातीच्या सात दिवसात ४९० तर शेवटच्या सात दिवसात ५९० जणांना संसर्ग झाला होता.जिल्ह्यात जून महिन्यापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रित होती. जुलै व आॅगस्ट महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला असून, आॅगस्टअखेर जिल्ह्यात १७५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा आलेख सर्वाधिक उंचावला. या एका महिन्यात २६२८ रुग्ण आढळून आल्याने कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यताही वर्तविण्यात येत होती. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीच्या सात दिवसात ४९० तर शेवटच्या सात दिवसात २४ ते ३० सप्टेंबर या दरम्यान ५९० जणांना संसर्ग झाला. आॅक्टोबर महिन्यात मात्र कोरोनाचा आलेख घसरल्याचे सुरूवातीच्या सात दिवसात दिसून येते. या सात दिवसात एकूण ३०० जणांना कोरोना संसर्ग झाला. दुसरीकडे कोरोनाचा धोका अजून टळला नसून, प्रत्येकाने यापुढेही आवश्यक ती खबरदारी घेत कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.
कोरोनाचा आलेख घसरला; पण धोका अजून टळला नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 4:17 PM
CoronaVirus in Washim सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा आलेख सर्वाधिक उंचावला.
ठळक मुद्देसात दिवसात ३०० जणांना संसर्गसप्टेंबरमध्ये सात दिवसात ४९० जण होते बाधित