वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी २३५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २५ फेब्रुवारी रोजी पाॅझिटिव्ह आला. यामध्ये पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज यांचाही समावेश आहे. दरम्यान, ३९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
गत आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. बुधवारी कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर, गुरुवारी आणखी २३५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील ९ व तालुक्यातील तांदळी ३, अनसिंग ४, एकांबा १, पार्डी टकमोर ७, साखरा १, भटउमरा २, वारला २, हिवरा गणपती २, मालेगाव शहरातील ५, अमानी ३, शेलगाव बोंदाडे १, बोर्डी १, आमखेडा येथील १, शिरपूर २, गौरखेडा १, मानोरा शहरातील ६, दापुरा १, कुपटा १, पाळोदी १, वाईगौळ येथील २, वाई येथील १, पोहरादेवी येथील ७, भुली येथील १, सोयजना येथील १, गुंजी येथील १, वाटोडा येथील १, धामणी येथील १, रोहणा येथील १, मंगरूळपीर शहरातील ३, रामसिंग वाडी २, शहापूर ५, बोरवा १, पोटी येथील १, हिसई येथील १, पार्डी ताड येथील ११, पेडगाव येथील २, तांदळी येथील ३, रिसोड शहरातील ८, मोप येथील १, लिंगा येथील १, बाळखेड येथील १, गौंधाळा येथील १, नंधाना येथील ३, कंकरवाडी येथील ५, एकलासपूर येथील ३, केनवड येथील १, मसला येथील १, मांगूळ झनक येथील १, कारंजा शहरातील ३६, हिंगणवाडी येथील १, धनज येथील ९, मेहा येथील १२, अंबोडा येथील १, भिवरी येथील ४, पिंपळगाव १, नागरवाडी ४, पोहा १, मोहल १, पारवा कोहर येथील १, उंबर्डा बाजार येथील ३, वडगाव रेंगे येथील १, कामठवाडा येथील १, पिंपळगाव गुंजाटे येथील १, येवता येथील १२, हिवरा लाहे येथील १, घोमरा येथील १, बेंबळा येथील १, भडशिवणी येथील १, अस्तना येथील १, पिंप्री मोडक येथील २, भूलोडा येथील १, शिवणी येथील १, कामरगाव येथील ४, विळेगाव येथील १ तसेच कुपटी येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८,४७५ वर पोहोचली असून, आतापर्यंत १५७ जणांचा मृत्यू झाला आहे.
०००
१,०८६ बाधितांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,४७५ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ७,२३१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १५७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत १,०८६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.