लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : धान्य वाटप नियमानुसार न केल्याप्रकरणी रिसोड तालुक्यातील दोन दुकानांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये मांगुळ झनक येथील अंगणवाडी सेविका लता रविंद्र काळपांडे यांचा समावेश आहे. या कारवाईच्या विरोधात ते अपिलसाठी अमरावती येथे गेले होते त्यानुसार त्यांना २० दिवसासाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मांगुळ झनक येथील सरपंच माधवी दत्त२ाव झनक यांनी संबधितांकडे तक्रार करुन अमरावती येथून परत आलेल्या दुकानदारास होम क्वारंटाईन करावे अशी मागणी केली होती. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्हयातील व्यक्ती कोणी बाहेरगावी जात असेल तर त्याला रितसर परवानगी घेण्याचे आदेश आहेत. मांगुळ झनक येथील स्वस्त धान्य दुकानदार लता काळबांडे यांनी गोरगरिबांना लाभ होईल तसेच महिन्याचे वाटप सुुध्दा गोरगरिब जनतेला योग्य रितीने करावे, जास्त पैसे घेऊ नये असे शासनाचे कडक निेर्देष असतांना नियमानुसारधान्याचे वाटप न केल्याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी खुलासा मागविला होता, खुलासा समाधानकारक नसल्याने स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला होता. परवाना रद्द झाल्यानंतर काळपांडे अमरावती येथे अपिल सादर करण्याकरिता तहसीलदार यांच्या परवानगीने काळपांडे अमरावती येथे जावून आलेत. तहसीलदारांनी दिलेल्या परवानगीनुसार परतल्यानंतर २० दिवस होम क्वारंटाईन राहण्याच्या नियमानुसार त्यांनी घरीच राहणे आवश्यक होते, परंतु त्यांनी परतल्यानंतर घरात न राहता २८ एप्रिल रोजी धान्याचा माल उतरविला. यासंदर्भात मांगुळ झनक येथील सरपंच माधवी दत्तराव झनक यांनी तक्रार केल्यावरुन उपविभागीय अधिकारी यांनी या प्रकरणाचा खुलासा मागून सदर दुकानदारास होम क्वारंटाईनच्या कडक सूचना केल्या आहेत.बाल विकास प्रकल्प अधिकाºयांनी केला अहवाल सादरस्वस्त धान्य दुकानदार होम क्वारंटाईन संदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागितलेल्या अहवालानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी अहवाल सादर केला. त्यानुसार अंगणवाडी सेविका तहसीलदार रिसोड यांच्या आदेशान्वये त्यांच्या अधिनस्थ असलेल्या स्वस्त धान्य दुकानावर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केलेल्या रद्दच्या कारवाई विरोधात अपिल दाखल करण्यासाठी उपायुक्त पुरवठा कार्यालय अमरावती येथे गेल्या होत्या. तहसीलीदार यांनी दुकानादार यांना परवानगी आदेशामध्ये परतल्यानंतर २० दिवस होम क्वारंटाईन राहण्याची अट दिलेली आहे. सदर २० दिवसाच्या कालावधीत त्यांच्याकडील अतिरिक्त प्रभार अंगणवाडी सेविका प्रमिला विष्णु भूक्तर यांच्याकडे सोपविला आहे. तसेच स्वस्त धान्य दुकानदार लता रविंद्र काळपांडे यांनी २८ एप्रिल रोजी धान्याचा माल उतरविला आहे. त्यामुळे हे धान्य लाभार्थ्यांना कधी देण्यात येईल या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नंतर कळविण्यात येणार असल्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी अहवालात म्हटले आहे. या अहवालाची प्रत तक्रारकर्ते मांगुळ झनक येथील सरपंच माधवी झनक यांना पाठविले
CoronaVirus : स्वस्त धान्य दुकानदाराला केले ‘होम क्वारंटाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 4:42 PM