लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात यापूर्वी आलेल्या अनेक नागरिकांना ‘होम क्वारंटीन’चे आदेश देवून त्यांना घरीच अलगीकरणात थांबण्यास सांगण्यात आले. मात्र, ग्रामीण व शहरी भागातही काही व्यक्ती या आदेशाचे उल्लंघन करून खुलेआम फिरत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे येत आहेत. त्यामुळे ‘होम क्वारंटीन’च्या सूचना असलेल्या व्यक्ती गावात अथवा शहरात फिरताना आढळ्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी १६ एप्रिल रोजी दिला.जिल्ह्यात आतापर्यंत केवळ एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला असून, त्या रुग्णाचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आला आहे. तथापि, यापुढे सतर्क राहत जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी अजून प्रभावीपणे सुरू केली आहे. जे नागरिक परजिल्हा किंवा परराज्यातून आलेले आहेत किंवा संदिग्ध म्हणून होते अशा सर्व नागरिकांना ‘होम क्वारंटीन’चा सल्ला देण्यात आला. परंतू, यापैकी ्रकाही नागरिक हे शहर तसेच ग्रामीण भागात खुलेआम फिरत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे येत आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलत या व्यक्तींना घरातच राहावे अन्यथा गावात किंवा शहरात फिरताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.विनापरवानगी जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींची माहिती द्याविना परवानगी जिल्ह्यात कोणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तरीही इतर मागार्ने जिल्ह्यात विना परवानगी येणा?्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे अशाप्रकारे एखादी व्यक्ती जिल्ह्यात, गावात दाखल झाल्यास नागरिकांनी याबाबतची माहिती संबंधित तहसील कार्यालय अथवा जिल्हा प्रशासनाच्या ८३७९९२९४१५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून अथवा व्हॉटसअप संदेशाद्वारे द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Coronavirus : ‘होम क्वारंटीन’चा आदेश देऊनही ‘त्या’ नागरिकांचा गावात संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 11:11 AM