लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत कार्यालयात किमान ५० टक्के उपस्थिती राखून कर्मचाºयांना आळीपाळीने कर्तव्यावर बोलावण्याच्या सुचना मध्यवर्ती कार्यालयाने २० मार्च रोजी दिल्या, तसेच रजा मागणाºया कर्मचाºयांना तातडीने परावर्तित रजा मंजूर करण्यासह त्यांचे संपर्क क्रमांक व पत्ता नमूद करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळ हे सार्वजनिक उपक्रम सेवा म्हणून जाहीर करण्यात आले. त्यामुळे ही सेवा पूर्णपणे बंद ठेवता येणार नाही. त्यासाठी चालनाशी संबंधित महामंडळातील तातडीचे व महत्त्वाचे काम चालू राहण्यासाठी संबंधित खाते प्रमुख, घटक प्रमुख यांना त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व अधिकारी, कर्मचाºयांना कार्यालयात उपस्थित ठेवणे आवश्यक आहे. तथापि, कोरोना विषाणूच्या संसर्गावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळातील अधिकारी, कर्मचाºयांची उपस्थिती नियंत्रित करणेही आवश्यक आहे. या पृष्ठभूमीवर महामंडळाने कार्यालयीन कर्मचाºयांची दररोजची उपस्थित नियंत्रित करताना अधिकारी, कर्मचाºयांना आळीपाळीने कार्यालयात बोलावून कामाचे नियोजन करण्याच्या सुचना विभाग नियंत्रक स्तरावर दिल्या आहेत. अशी कार्यवाही करताना कार्यालयात ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहतील, याची खबरदारीही घेतानाच ५० टक्के उपस्थित कर्मचाºयांबाबतची नोंद संबंधित खाते प्रमुख, घटक प्रमुख, विभाग प्रमुखांच्या दप्तरी ठेवावी लागणार आहे. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळातील ज्या अधिकारी, कर्मचाºयांना आपत्कालीन परिस्थितीत रजा घ्यायची आहे. त्यांना तातडीने रजा मंजूर करण्यासह. वैद्यकीय रजेबाबत वैद्यकीय प्रमाण पत्र सादर न करता परिवर्तित रजा संबंधितांना मंजूर करण्याचे निर्देशही दिले आहेत. ही कार्यवाही करताना रजा घेणाºया अधिकारी, कर्मचाºयांचा संपर्क क्रमांक, पत्ता, ई-मेल आयडी कार्यालयास उपलब्ध करून घेण्यात येणार असून, या अधिकारी, कर्मचाºयांना आवश्यक वेळी कार्यालयात उपस्थित राहणेही अनिवार्य असेल. राज्य परिवहन महामंडळात कार्यरत चालक, वाहकांच्या ५० टक्के उपस्थितीसह त्यांचया कामाच्या नियोजनाबाबत वाहतूक खात्यामार्फत व यंत्र अभियांत्रिकी खात्यामार्फत आवश्यकतेनुसार स्वतंत्र सुचना निर्गमित करण्यात येणार असल्याचेही महामंडळाने या संदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
CoronaVirus : एसटीच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियंत्रित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 11:45 AM