शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी तीन पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 11:26 AM

रिसोड शहरातील एक, तामशी येथील दोन अशा एकूण तीन जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल २३ जून रोजी सायंकाळी पॉझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसोड शहरातील एक, तामशी येथील दोन अशा एकूण तीन जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल २३ जून रोजी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ८३ झाली असून, यापैकी दोघांचा मृत्यू तर ४८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत ३३ जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.जून महिन्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असणाऱ्या संदिग्ध रुग्णांना तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. गत १० दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. २३ जून रोजी एकूण ५४ अहवाल प्राप्त झाले. ५१ अहवाल निगेटिव्ह तर तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.सायंकाळी प्राप्त अहवालानुसार वाशिम तालुक्यातील तामसी येथील ५५ वर्षीय महिला व २५ वर्षीय युवक कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले तसेच आसन गल्ली, रिसोड येथील ३८ वर्षीय महिलेचा कोरोनाविषयक अहवाल सुद्धा 'पॉझिटिव्ह' आला आहे. हे सर्वजण यापूर्वीच्या कोरोनबाधितांच्या नजीकच्या संपर्कातील आहेत. आता कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८३ झाली असून, अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ३३ आहेत.

सात जणांची कोरोनावर मात२३ जून रोजी जिल्ह्यातील एकूण सात जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील १,रिसोड येथील ३, कारंजा लाड २, शेलुबाजार (ता. मंगरुळपीर) येथील १अशा ७ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ८३ पैकी केवळ दोघांचा मृत्यू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक असल्याचे दिसून येते.२२ जून रोजी पाठविलेल्या अहवालांपैकी दोन आणि २३ जून रोजी पाठविलेले ९० असे एकूण ९२ जणांच्या थ्रोट स्वॅब नमुन्याचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. २४ व २५ जून रोजी अहवाल नेमके काय येतात याकडे लक्ष लागून आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम