लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शुक्रवार ३ जुलै रोजी आज सकाळी २२ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी १९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह तर ०३ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यात खडकी (ता. मालेगाव) येथील ३२ वर्षीय व्यक्ती, वाशिम शहरातील शासकीय निवासस्थान परिसरातील ६५ वर्षीय महिला व मोठा गवळीपुरा परिसरातील ४५ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. दरम्यान, शुक्रवारी तिघांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११६ झाली आहे. त्यात जिल्ह्यातील ११२, तर वाशिम जिल्ह्यातील रहिवासी; परंतु परजिल्ह्यात उपचार घेणाऱ्या १२ जणांचा समावेश आहे. त्यापैकी एकाचा वाशिम जिल्ह्यात, तर दोघांचा परजिल्ह्यात मृत्यू झाला आहे. शिवाय ८० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यात जिल्ह्यात उपचार घेणाºया ७८, तर परजिल्ह्यात उपचार घेणाºया २ जणांचा समावेश आहे. सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात २५ आणि बाहेरच्या जिल्ह्यात ८ रुग्ण मिळून वाशिम जिल्ह्यातील एकूण ३३ रुग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवार ३ जुलै रोजी तिघांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यात तामसी येथील ०२ व रिसोड येथील ०१ अशा तीन व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता ८० वर पोहोचली असून, जिल्ह्यात कोरोनामूक्त होणाºया रूग्णांचे प्रमाणही वाढतच असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने वाशिम व कारंजा शहरातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी व शरीरातील आॅक्सिजन पातळी तपासणी मोहिम २१ जूनपासून सुरू केलेली आहे. या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षणही करण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक नागरिकांच्या घरी जावून घरात असलेल्या संपूर्ण कुटुंबाची नोंद करुन तपासणी केल्या जात असून नागरिकांचे टेम्परेझर, प्लस यासह आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. शरीराचे तापमान जास्त आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधल्या जात आहे. या मोहीमेस नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतिने करण्यात येत आहे. कारंजा तालुक्यातील नागरिकांची तपासणी वेगातकारंजा तालुक्यात गेल्या महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढू लागताच प्रशासन आणि आरोग्य विभागाने शहरास तालुक्यातील ग्रामीण भागांत नागरिकांची तपासणी सुरू केली. यासाठी तालुका आरोग्य अधिकाºयांच्या मार्गदर्शनात डॉक्टरांचा समावेश असलेल्या पथकांची नियुक्ती करण्यात आली. या पथकांनी शहरातील कन्टेनमेंट झोनसह इतर भागातील नागरिकांची तपासणी केली, तर ग्रामीण भागातही गावागावात फिरून आरोग्य विभागाने तपासणी केली. या संपूर्ण तपासणीदरम्यान कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कातील व्यक्ती वगळता कोणातही कोरोना संसर्गाची लक्षणे आजवर आढळून आलेली नाहीत.