लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जानेवारी महिन्यात कोरोना लस येण्याची शक्यता असून, पहिल्या टप्प्यात फ्रंट लाइन वर्कर्स यांना ही लस देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात ७० हजार लिटर लस साठवणुकीची व्यवस्था आहे. देशात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. जानेवारी महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात फ्रंट लाइन वर्कर्स म्हणून सरकारी व खासगी क्षेत्रातील जवळपास सहा वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना ही लस देण्यात येणार आहे. लस साठवणुकीचे नियोजन करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात शीतगृह नसून शीत साखळी केंद्रे आहेत. शीतगृहासाठी अकोल्याचा आधार घेतला जातो. अकोला येथील शीतगृहात तीन महिन्यांचा साठा ठेवण्यात येईल. येथून एका महिन्याचा साठा वाशिमला मिळणार आहे. लसीकरण व लस साठवणुकीचे पूर्वनियोजन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.अकोल्यात शीतगृह वाशिम जिल्ह्यासाठी स्वतंत्र शीतगृह नाही. अकोला येथील शीतगृहात वाशिम जिल्ह्यातील लसी व अन्य वैद्यकीय साठा ठेवण्यात येतो. कोरोना लस प्राप्त झाल्यानंतर अकोला येथील शीतगृहात ठेवली जाईल. तेथून जिल्हास्तरावर आणि जिल्हास्तरावरून मग प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय स्तरावरील शीत साखळी केंद्रात लस ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
लस पोहोचविण्यासाठी विशेष वाहनेकोरोना लस प्राप्त झाल्यानंतर जिल्हा मुख्यालयातून तालुका स्तरावर पोहोचविण्यासाठी विशेष वाहनांची सोय केली जाणार आहे. तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालयात लस ठेवण्यात येणार आहे. येथून फ्रंट लाइन वर्कर्सला ही लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात सहा हजार फ्रंट लाइन वर्कर्स आहेत.
जिल्ह्यात शीत साखळी केंद्रजिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्र असून या सर्व ठिकाणी शीत साखळी केंद्र आहेत. त्याशिवाय ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा स्तरावर शीत साखळी केंद्र असून, येथे साठवणूक केली जाणार आहे.
आगामी काळात कोरोना लस उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. व मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात नियोजन केले जात आहे. जिल्ह्यात ३५ शीत साखळी केंद्रे आहेत. अकोला येथे शीतगृह आहे. तेथून जिल्हास्तरावर लस प्राप्त झाल्यानंतर तालुकास्तरावर वितरण होईल. - डाॅ. अविनाश आहेर जिल्हा आरोग्य अधिकारी