लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, यामध्ये आणखी १० रुग्णाची भर पडल्याचे १० आॅगस्ट रोजी निदर्शनात आले. आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ९४५ झाली असून, यापैकी ४०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाशिम व कारंजा शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच चेहऱ्यावर मास्क किंवा रुमालचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक झपाट्याने वाढत असून, यामध्ये आणखी १० रुग्णांची भर १० आॅगस्ट रोजी पडली. सलग १० दिवसात ३५१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून येणे हा आतापर्यंतच सर्वाधिक उच्चांक आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ९४५ वर पोहोचली असून यापैकी ४०५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. मे महिन्यापर्यंत जिल्हयात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या नियंत्रित होती. जून व जुलै महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आॅगस्ट महिन्यात जास्त संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताणही आपसूकच वाढला आहे. १० आॅगस्ट रोजी वाशिम शहरातील दंडे चौक येथील १, देगाव येथील २, अनसिंग येथील १, कारंजा लाड शहरातील माळीपुरा येथील १, सुंदरवाटिका परिसरातील १, सोहोळ येथील ४ असे एकूण १० जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू तर एका रुग्णाने आत्महत्या केली.