शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
5
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
6
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
7
५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
8
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
9
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
10
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
11
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
12
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
13
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
14
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
15
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
17
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
18
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
19
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!

CoronaVirus in Washim : आणखी ११ कोरोनाबाधित; रुग्णसंख्या १४१  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 11:02 AM

आणखी ११ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून आता एकूण रुग्णसंख्या १४१ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ७ जुलै रोजी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आणखी ११ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून आता एकूण रुग्णसंख्या १४१ झाली आहे. यापैकी ४१ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.जिल्ह्यात मे महिन्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. जून महिन्यापासून वाढत असलेली रुग्णसंख्या जुलै महिन्यातही वाढतच असल्याचे प्राप्त अहवालावरून दिसून येते. ७ जुलै रोजी दुपारी ४ वाजतादरम्यान २६ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी १५ अहवाल निगेटिव्ह आहेत. उर्वरित ११ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये वाशिम शहरातील ९ व मंगरूळपीरमधील २ व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्वजण यापूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील आहेत. वाशिम शहरातील गवळीपुरा परिसरातील १८ वर्षीय युवक, ११ वर्षीय मुलगा, २०, ३० व ३८ वर्षीय महिला, १४ व १६ वर्षीय युवती, तसेच गंगू प्लॉट परिसरातील ३५ व ४४ वर्षीय व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंगरूळपीर येथील संभाजी नगर परिसरातील ३४ वर्षीय व्यक्ती व मदार तकिया, माळीपुरा परिसरातील ६६ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.आता एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या १४१ झाली असून, यामध्ये ४१ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. १४१ रुग्णांमध्ये जिल्ह्यातील १२६, तर वाशिम जिल्ह्यातील रहिवासी; परंतु परजिल्ह्यात उपचार घेणाऱ्या १५ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात ३३ तर जिल्ह्याबाहेर आठ अशा एकूण ४१ जणांवर उपचार सुरू आहेत.

१५० जणांच्या अहवालाकडे लक्षजुलै महिन्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. विशेषत: वाशिम शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील जवळपास १५० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याचा अहवाल ८ व ९ जुलै रोजी प्राप्त होईल, असा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे. या अहवालाकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या