वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, रविवार २६ जुलै रोजी दिवसभरात एकूण १३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५३१ झाली असून, यापैकी २२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात जुलै महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडली. २६ जुलै रोजी दुपारी ८६ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी ८२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आहेत. ४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह असून यामध्ये वाशिम शहरातील बेलदारपुरा येथील १, गिरोली (ता. मानोरा) येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील १ व नांदगाव येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये मंगरुळपीर तालुक्यातील शेलगाव येथील शिंदे कॉलनी परिसरातील १, आसेगाव येथील १, मांगवाडी (ता. रिसोड) येथील १, वाशिम शहरातील सोफिया नगर येथील १, कारंजा लाड शहरातील अशोक नगर परिसरातील ३ व शिंदे नगर परिसरातील २ अशा एकूण ९ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५३१ वर पोहचला असून, यापैकी २९५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. २२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर पोलीस विभागाने संबंधित परिसर सील केला.१५ जणांना डिस्चार्जशनिवारी १५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये वाशिम शहरातील फकीरपुरा येथील १, रिसोड शहरातील सिव्हिल लाईन्स परिसर ३, गजानन नगर परिसर ३, मांगवाडी येथील १, वनोजा (ता. रिसोड) येथील १, पांगरी कुटे (ता. मालेगाव) येथील १, कारंजा लाड शहरातील आदर्श कॉलनी १, सहारा कॉलनी १, इंदिरा नगर १, शिक्षक कॉलनी १, पोलीस कॉलनी परिसरातील एका व्यक्तीचा समावेश आहे.२२७ जणांवर उपचार५३१ पैकी २२७ जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच तालुकास्तरीय कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला तर २९५ रुग्ण बरे झाले आहेत. उपचार सुरू असलेल्या २२७ जणांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
CoronaVirus in Washim : आणखी १३ जण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 11:22 AM