लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, यामध्ये आणखी २१ रुग्णाची भर पडल्याचे १० आॅगस्ट रोजी निदर्शनात आले. आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ९५६ झाली असून यापैकी ३५९ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. वाशिम व कारंजा शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे.आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, यामध्ये आणखी २१ रुग्णांची भर १० आॅगस्ट रोजी पडली. सलग १० दिवसात ३६२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून येणे हा आतापर्यंतच सर्वाधिक उच्चांक आहे. जून व जुलै महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आॅगस्ट महिन्यात जास्त संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली. कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताणही आपसूकच वाढला आहे. १० आॅगस्ट रोजी एकूण २१ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. सकाळच्या अहवालानुसार, वाशिम शहरातील दंडे चौक येथील १, देगाव येथील २, अनसिंग येथील १, कारंजा लाड शहरातील माळीपुरा येथील १, सुंदरवाटिका परिसरातील १, सोहोळ येथील ४ असे १० जण आढळून आले. सायंकाळी ६.३० वाजताच्या अहवालानुसार वाशिम शहरातील सुदर्शन नगर परिसर २, काटीवेश परिसर १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर १, मुठ्ठा १, मानोरा तालुक्यातील गुंडी १, रिसोड तालुक्यातील गोहगाव हाडे २ व्यक्ती तसेच अकोला येथे उपचार घेत असलेले वाशिम शहरातील मंगळवार वेस परिसरातील १, धुमका येथील १, रिसोड तालुक्यातील एकलासपूर येथील १ असे एकूण ११ जण कोरोनाबाधित आढळून आले.
५७८ जणांची कोरोनावर मातसोमवारी एकूण ५९ जणांनी कोरोनावर मात केली. एकिकडे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना, दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याची बाब जिल्हावासियांसाठी दिलासादायक ठरत आहे. ९५६ रुग्णांपैकी आतापर्यंत ५७८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. उपचार सुरू असलेल्या ३५९ जणांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.