लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, ३० आॅगस्ट रोजी यामध्ये आणखी ५३ रुग्णांची भर पडली. आता कोरोनाबाधितांची संख्या १७२२ वर पोहोचली असून, यापैकी ४३६ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. जिल्ह्यात मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. जुलै महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेग आॅगस्ट महिन्यात अधिकच वाढत असून, यामध्ये ३० आॅगस्ट रोजी आणखी ५३ रुग्णांची भर पडली. यामध्ये वाशिम शहरातील पोस्ट आॅफिस जवळील ३, सुभाष चौक २, गुरुवार बाजार येथील २, सिव्हील लाईन परिसरातील १, टिळक चौक येथील २, निमजगा येथील ३, इमानदारपुरा येथील १, देवपेठ येथील १, कोकलगाव येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील जनुना येथील येथील १, शेलूबाजार येथील ६, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, पसरणी येथील १, शेलुवाडा येथील १, रिसोड शहरातील अनंत कॉलनी येथील २, समर्थ नगर येथील ३, सिव्हील लाईन येथील १, देशमुख गल्ली येथील १, किनखेडा येथील १६, येवती येथील २, सवड येथील १, मालेगाव तालुक्यातील करंजी येथील १ अशा ५३ जणांचा समावेश आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १७२२ झाली असून, यापैकी १२५५ जणांनी कोरोनावर मात केली.--खडकी येथील एका जणाचा मृत्यू२९ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजतादरम्यान जिल्हा कोविड हॉस्पिटल येथे दाखल झालेल्या व अॅन्टिजन टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रिसोड तालुक्यातील खडकी येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा ३० आॅगस्ट रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात किती जण आले, याची माहिती आरोग्य विभागातर्फे घेण्यात येत आहे. आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची तपासणी व सर्वेक्षण केले जात असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. १२५५ जणांची कोरोनावर मातएकिकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाºयांची संख्याही वाढत आहे. १७२२ रुग्णांपैकी आतापर्यंत १२५५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ४३६ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत.
Coronavirus in Washim : आणखी ५३ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १७२२ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 7:16 PM