वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी ८१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सोमवार, ७ सप्टेंबर रोजी निष्पन्न झाले. आता कोरोनाबाधितांची संख्या २२४४ वर पोहोचली आहे. दरम्यान सोमवारी ८४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.जुलै, आॅगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या वाढीचा वेग अधिकच वाढला असून, सोमवारी यामध्ये आणखी ८१ रुग्णांची भर पडली. यामध्ये वाशिम शहरातील सुदर्शन नगर परिसर ३, पाटील धाब्यामागील १, शिव चौक परिसर १, जुने पोलीस वसाहत परिसर १, विनायक नगर परिसर १, नवीन आययुडीपी परिसर १, नालंदा नगर परिसर १, गणेशपेठ परिसर १, सिव्हील लाईन्स परिसर १, चंडिकावेश परिसर १, स्वराज कॉलनी परिसर १, लाखाळा १, जिल्हा कारागृह परिसर ३, शहरातील इतर ठिकाणचे १, पंचशील नगर परिसर १, सौदागरपुरा येथील १, दंडे चौक परिसर ८, झाकलवाडी येथील १, वांगी येथील ५, कळंबा महाली येथील २, जांभरूण महाली येथील १, काजळंबा येथील ५, घोटा येथील १, खारोळा येथील १, मालेगाव शहरातील २, रिसोड शहरातील देशमुख गल्ली १, एकता नगर १, पोलीस स्टेशन परिसर ४, अनंत कॉलनी परिसर १, नगरपरिषद परिसर १, शहरातील इतर ठिकाणचे १, कासारगल्ली येथील ८, बेंदरवाडी येथील २, गुलबावडी येथील १, लोणी फाटा येथील २, देगाव येथील १, हिवरा पेन ३, किनखेडा १, महागाव ३, रिठद येथील ३, मांगुळझनक १, मंगरूळपीर शहरातील १ अशा ८१ जणांचा समावेश आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २२४४ झाली असून, यापैकी १५८९ जणांनी कोरोनावर मात केली तर ४१ जणांचा मृत्यू आणि एकाने आत्महत्या केली. आता ६१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)८४ जणांना डिस्चार्जसोमवारी एकूण ८४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये वाशिम शहरातील १५, रिसोड शहरातील २, किनखेडा येथील २०, येवती येथील १२, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम येथील ३, कोठारी येथील १, नांदगाव येथील १, शेलूबाजार येथील ४, नागी येथील १, कवठळ येथील १, जनुना येथील १, मालेगाव तालुक्यातील मैराळडोह येथील २, ब्राह्मणवाडा येथील १, करंजी येथील १, कारंजा लाड शहरातील मानक नगर येथील २, कुंभारपुरा येथील ३, अकोला अर्बन बँक जवळील १, गौतम नगर येथील २, सराफा लाईन परिसरातील १, शिवाजी नगर परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, कामरगाव येथील ४, मानोरा तालुक्यातील धामणी येथील १, उमरी येथील २ व्यक्तींचा समावेश आहे.
CoronaVirus in Washim : ८१ रुग्ण वाढले; ८४ बरे झाले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 12:15 PM